आधी रचिली पंढरी
आधी रचिली पंढरी।
मग वैकुंठ नगरी॥ १ ॥
जेव्हा नव्हते चराचर।
तेव्हा होते पंढरपूर॥
चंद्राभागेच्या तटी।
धन्य पंढरी गोमटी॥ २ ॥
जेव्हा नव्हत्या गोदा गंगा।
तेव्हा होती चंद्रभागा॥
चंद्राभागेच्या तटी।
धन्य पंढरी गोमटी॥ ३ ॥
नामा म्हणे बा श्री हरी।
ते म्या देखिली पंढरी॥
चंद्राभागेच्या तटी।
धन्य पंढरी गोमटी॥ ४ ॥