अहिल्या द्रौपदी सीता तारा चारी
अहिल्या द्रौपदी सीता तारा चारी ।
मुख्य मंदोदरी पतिव्रता ॥१॥
नामें घेतां त्यांची वाणी हे पवित्र ।
होय कुळगोत्र उद्धरण ॥२॥
संकल्प विकल्प सांडोनियां दुरी ।
वाचे हरि हरी उच्चारावें ॥३॥
नाहीं बद्धकता तया संसाराची ।
जाचणी यमाची मग कैंची ॥४॥