हरिपाठ→संत श्री तुकाराम महाराजआम्हीं मानवानी वर्णावें तें काय♡ Favoriteआम्हीं मानवानी वर्णावें तें काय । सुरवर पाय वंदिताती ॥१॥ गणेश शारदा करिती गायन । आदिदेव गण श्रेष्ठ श्रेष्ठ ॥२॥ जयाच्या गायना तिष्ठतो शंकर । तयासी पैं पार न कळे तुझा ॥३॥ तुका म्हणे आम्ही किंकर ते किती । इंद्राची ती मती नागविली ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→