अंजनीच्या सुता, तुला रामाचे वरदान,
एक मुखान बोला, बोला जय जय हनुमान ॥धृ॥
धन्य तुझी रामभक्ती, धन्य तुझी काया,
बालपणी गेलास तू सूर्याला धराया
हादरली ही धरती,
थरथरले आसमान ॥१॥
सीतामाई शोधासाठी, गाठलीस लंका,
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे,
पण हसले विभीषण ॥२॥
हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला,
पाहिलेस फोडून मोती, राम कुठे आतला
उघडून आपली छाती दाखविले प्रभु भगवान ॥३॥