अभंग→विठ्ठलबांधू विठ्ठल सांगडी♡ Favoriteपूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥ बांधू विठ्ठल सांगडी । पोहुनि जाऊ पैलथडी ॥२॥ अवघे जन गडी । घाला उडी भाईनो ॥३॥ हें तों नाहीं सर्वकाळ । अमूप अमृताचे जळ ॥४॥ तुका म्हणे थोर पुण्यें । ओघ आला पंथे येणें ॥५॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→