डम डम डम डम डमरूवाला
पार्वतीपती कैलासवाला
शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला ॥ धृ ॥
तुझ्या कपाळा भस्माचा टिळा
तुझ्या कपाळा भस्माचा टिळा
शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला ॥
तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा
तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा
शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला ॥
तुझ्या हातामध्ये त्रिशूळ भाला
तुझ्या हातामध्ये त्रिशूळ भाला
शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला ॥
तुझ्या गळ्यामध्ये सर्पाच्या माळा
तुझ्या गळ्यामध्ये सर्पाच्या माळा
शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला ॥
तुझ्या सेवेला नंदी हा आला
तुझ्या सेवेला नंदी हा आला
शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला ॥
तुझ्या जटे मध्ये गंगेची धारा
तुझ्या जटे मध्ये गंगेची धारा
शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला ॥