असा कसा ग बाई
देवाचा देव ठकडा
देव एका पायाने लंगडा ।।धृ।।
गवळ्या घरी जातो । दही दूध खातो
करी दह्या दुधाचा खडा ।।१।।
शिंकेची तोंडीतो मडकीची फोडी तो
पाडी नवनीताचा सडा ।।२।।
वाळवंटी जातो कीर्तन करितो
लावी साधुसंतांचा झगडा ।।३।।
एका जनार्दनी । भिक्षा वाढ माय
देव एकनाथाचा बछडा ।।४।।