देवा गजानना आरती ही तुजला!!
गातो तव लिला, गातो तव लिला!
देवा गजानना आरती ही तुजला!! धृ.!!
जास्वंदीची आवड तुला!
दुर्वा जुडी वाहू तुजला!!
आळवितो तुला, आळवितो तुला!! १!!
पृथ्वी प्रदक्षिणा कार्तिकला!
मात्यापित्या भोवती तू फिरला!!
मान पहिला तुला, हा मान पहिला तुला!! २!!
येसी घरी भाद्रपदाला!
चतुर्थी सुखाचा सोहळा!!
भक्त आनंदाला, प्रकाश गोपाळ आनंदाला!! ३!!