देवा तुझ्या रे पैजनी
ऋण झुण, ऋण झुण... वाजती पायी
देवा तुझ्या रे पैजनी,
हे देवा, देवा तुझ्या रे... पैजनी...॥
भाद्रपद मासी शुद्ध चतुर्थी आनंदाने,
येसी घरा देवा,
आनंदाने येसी घरा...॥
ऋण झुण, ऋण झुण... वाजती पायी
देवा तुझ्या रे पैजनी,
हे देवा, देवा तुझ्या रे पैजनी...॥
मुकुट झळके... शिरी तुझ्या रे
कानी चमकती... कुंडले,
हे देवा, कानी चमकती कुंडले...॥
ऋण झुण... ऋण झुण... वाजती पायी
देवा तुझ्या रे पैजनी,
हे देवा, देवा तुझ्या रे पैजनी...॥
आम्हा भक्तांना... आशीर्वाद देई
हेच मागणे तुझिया चरणी,
हेच मागणे तुझिया चरणी...॥