देवाचिये द्वारी उभा क्षणभरी,
तेणे मुक्ति चारी साधियेला ॥धृ॥
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करी ॥१॥
आसोनी संसारी जीवे वेद करी,
वेदशास्त्र उभारी बाह्यासदा ॥२॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खूणा,
द्वारकेचा राणा पांडवांघरी ॥३॥
धर्म करा धर्म करा,
तेणे देव येती घरा ॥धृ॥
धर्म पांडवांनी केला,
संगे देव राबविला ॥१॥
धर्माविणा नाही गती,
धर्म तयाचेसंगती ॥२॥
तुका म्हणे धर्म,
कोण जाणे तयाचे वर्म ॥३॥