दीनदयाळा गणपति स्वामी
दीनदयाळा गणपति स्वामी द्यावी मज भेटी।
तव चरणांची सखया मजला आवडी मोठी॥ धृ.॥
कवण अपराध म्हणवुनि देवा केला रुसवा।
अहर्निशी मी हृदयी तुझा करितसे धांवा॥ १ ॥
दीनदयाळा गणपति स्वामी द्यावी मज भेटी।
तव चरणांची सखया मजला आवडी मोठी॥ धृ.॥
चिंताकूपी पडलों कोण काढील बाहेरी।
धांवें पावें सखया करुणा करुनि उद्धरी॥ २ ॥
दीनदयाळा गणपति स्वामी द्यावी मज भेटी।
तव चरणांची सखया मजला आवडी मोठी॥ धृ.॥
ऐसे होते चित्ती तरि का प्रथमचि देवा।
अंगीकार करुनि केला कृपेचा ठेवा॥ ३ ॥
दीनदयाळा गणपति स्वामी द्यावी मज भेटी।
तव चरणांची सखया मजला आवडी मोठी॥ धृ.॥
आतां करणें त्याग तरिही स्वामी अघटित।
शरण आलों माझा आता चुकवी अनर्थ॥ ४ ॥
दीनदयाळा गणपति स्वामी द्यावी मज भेटी।
तव चरणांची सखया मजला आवडी मोठी॥ धृ.॥
यादवसुत हा विनवी दोन्ही जोडूनियां कर।
तव चरणाचा सखया मजला आहे आधार॥ ५ ॥
दीनदयाळा गणपति स्वामी द्यावी मज भेटी।
तव चरणांची सखया मजला आवडी मोठी॥ धृ.॥