हरिपाठ→श्री संत ज्ञानेश्वर महाराजएकतत्व नाम📤 Share♡ Favoriteएकतत्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा येईल तुझी ॥१॥ तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद । वाचेसी सुस्वर जपे आधीं ॥२॥ नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिका पंथा जाशी झणी ॥३॥ ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→