फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार
विठ्ठल तू वेडा कुंभार ... ।।धृ।।
माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळाच मग ये आकार
तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार ... ।।१।।
घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाच्या देव वेगळ्या
विना हे कोण न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार ... ।।२।।
तूच घडविशी तूच फोडिशी कुंभारशी तू तूच जोडिशी
न कळे यातून काय सांधिशी
देशी डोळे परी निर्मिसी तया पुढे अंधार ... ।।३।।