सोहळा हा सजला हरिनामाचा
सारे निघाले वारकरी
विठ्ठू नामाचा गजर करा राम कृष्ण हरी ॥ धृ ॥
ज्ञानेशाची अमृत गाणी,
संत तुकयाची अभंग वाणी
संतजणांची परंपरा ही विठ्ठल विठ्ठल ध्यानी मनी
विठ्ठूनामाच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी ॥ १ ॥
चंद्रभागेच्या काठी उभी ही,
धन्य तुझी ही पंढरी सारी
संकट काळी धावून येती, त्या भक्तांचा तू कैवारी
भक्तांना या तारून न्याया उभा राहिला विठेवारी ॥ २ ॥