अभंग→गणराया लवकर येईGanaraya Lavkar Yei📤 Share📋 Copy♡ FavoriteमराठीEnglishगणराया लवकर येईगणराया लवकर येई। भेटी सकलासी देई॥ अंगी शेंदुराची उटी। केशर कस्तूरी लल्लाटी॥ १ ॥ पायी घागुऱ्या वाजती। नाचत आले गणपती॥ २ ॥ अवघ्या गणाचा गणपती। हाती मोदकाची वाटी॥ ३ ॥ तुका म्हणे शोधून पाहे। विठ्ठल गणपती दुजा नोहे॥ ४ ॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→