गणपतीला माझ्या, गणरायाला माझ्या,
आवडतो मोदक छान ॥धृ॥
वर्षांनी आले बाप्पा घराला,
आनंद झाला आमुच्या मनाला।
मखर सजविला छान ॥१॥
रुणझुण रुणझुण वाजती टाळ,
शिव-पार्वतीचा लाडका हा बाळ।
कीर्ती जगी महान ॥२॥
भजनाला आता चढलाया रंग,
भक्तजन सारे झालेत दंग।
भाविक गाती गाणं ॥३॥