गणराया आरती ही तुजला
गणराया आरती ही तुजला ॥ धृ.॥ रुणझुण पायीं वाजति घुंगूर। गगनी ध्वनी भरला ॥1॥
भाद्रपद मासी शुक्लचतुर्थीसी। पुजिती जन तुजला ॥ 2 ॥ गणराया आरती ही तुजला ॥
गंध पुष्प धुप दीप समर्पनी । अर्पिती पुष्यांला ॥ 3 ॥ गणराया आरती ही तुजला ॥
भक्त हरी हा आठवितो रुप। गातो तव लीला ॥ 4 ॥ गणराया आरती ही तुजला ॥