गवळ्या घरची भोळी राधा,
कान्हाला भुलविते ॥
डोळा मारुनी तोंड मुरडते ॥
कान्हाला भुलविते राधा
कान्हाला भुलविते ॥ धृ ॥
डोईवरी माझ्या दुधाचे माठ ॥
विकायला घाई करते, बाजारी ॥
गवळ्या घरची भोळी राधा,
कान्हाला भुलविते ॥१॥
डोईवरी माझ्या दह्याचे माठ ॥
धायाला नाही म्हणते, कान्हाला ॥
गवळ्या घरची भोळी राधा,
कान्हाला भुलविते ॥२॥