गवळ्या घरची भोळी राधा कान्हाला भुलवते
गवळ्या घरची भोळी राधा कान्हाला भुलवते
डोळा मारनी तोंड मुरडते
कान्हाला भुलवते, राधा कान्हाला भुलवते ॥ धृ ॥
दोईवर बाई दुधाचे माट
विकायला बाई करते बाजारी
गवळ्या घरची भोळी राधा कान्हाला भुलवते ॥ १ ॥
दोईवर बाई दह्याचे माट
घ्यायला नाही म्हणते कान्हाला
गवळ्या घरची भोळी राधा कान्हाला भुलवते ॥ २ ॥
एका जनार्दनी गवळण राधा
कान्हाला भुलवते, ही राधा हरीचे गुण गाते
गवळ्या घरची भोळी राधा कान्हाला भुलवते ॥ ३ ॥