अभंग→विठ्ठलगोणाई राजाई दोघी♡ Favoriteगोणाई राजाई दोघी सासू सुना, दामा नामा जाणा बापलेक ॥१॥ नारा विठा गोंदा महादा चवघे पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी ॥२॥ लाडाई गोडाई येसाई साखराई, चवघी सुना पाहीन नामयाच्या ॥३॥ लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी, विडीपिशी जनी नामयाची ॥४॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→