गुरु सुतार अमुचा भला
गुरु सुतार अमुचा भला, त्याने खेळाया भवरा दिला।।
ज्ञान भवरा विवेक आरी, शिव भक्ती लाविली दोरी।
चला चला खेळ खेळाया, का नाडता पाया॥ १ ॥
ज्ञान भवरा निर्गुणाचा, भक्तीमार्ग खेळ साचा।
काम क्रोध बोलावा वेळी, आम्ही करू तया होळी॥ २ ॥
धरुनी टांगे ओढायासी, आम्ही अजिंक्य होऊ काळासी।
कलिसाठी हा शिवदास, शरण जाऊ दुरगतीस॥ ३ ॥