हरिपाठ→श्री संत ज्ञानेश्वर महाराजहरि उच्चारणी📤 Share♡ Favoriteहरि उच्चारणी अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ॥१॥ तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपतां हरी ॥२॥ हरि उच्चारण मंत्र पै अगाध । पळे भूतबाधा भजें तेथें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवें अर्थ उपनिषदां ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→