हरिपाठ कीर्ति
हरिपाठ कीर्ति मुखें जरी गाय ।
पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥
तपाचे सामर्थ्य तपिना अमूप ।
चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥२॥
मातु पिता भ्राता सगोत्र अपार ।
चतुर्भुज नर होउनि ठेले ॥३॥
ज्ञान गूढागूढ ज्ञानदेवा लाधलें ।
निवृत्तीनें दिधलें माझें हातीं ॥४॥