हरिवंशपुराण
हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन ।
हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥
त्या नरा लाधलें वैकुंठ जोडिलें ।
सकळीं घडले तीर्थाटन ॥२॥
मनोमार्गें गेला तो तेथें मुकला ।
हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी ।
रामकृष्णीं आवडी सर्वकाळ ॥४॥