जात्याच्या मुखी घालिते,
मोत्याचे दाणे |
तुझ्या कृपेने मला विठ्ठला,
काही नाही उणे || १ ||
विश्वाचे तू फिरवीसी जाते |
पीठ पाडीशी दैवाचे ||
जात्याच्या मुखी घालिते,
मोत्याचे दाणे || २ ||
चंद्र सूर्य हे तुझेच डोळे |
जसे शरदाचे चांदणे ||
जात्याच्या मुखी घालिते,
मोत्याचे दाणे || ३ ||
जनी म्हणे विसरले |
हे रूप तुझे आगळे ||
जात्याच्या मुखी घालिते,
मोत्याचे दाणे || ४ ||