जाऊदे जाऊदे जाऊदे जाऊदे बाजाराला
हा गवळण राधेला हा गवळण राधेला ।।धृ।।
यमुनेचा अवघड घाट,
कान्हा अडवीतो आमची वाट,
धरी रे धरी रे पदराला,
हा गवळण राधेला हा गवळण राधेला ।।१।।
आल्या गवळणी करून थाट,
आमच्या डोईवरी दुधाचे माठ
फोडी रे फोडी रे माठाला,
हा गवळण राधेला हा गवळण राधेला ।।२।।
एका जनार्दनी गवळण राधा,
आमचा दह्या दुधाचा धंदा,
धरी रे धरी रे पदराला,
हा गवळण राधेला हा गवळण राधेला ।।३।।