ज्या सुखा कारणे देव वेडावला
ज्या सुखा कारणे देव वेडावला,
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला॥
धन्य धन्य संताचे सदन
तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण॥ १ ॥
सर्व सुखाची सुखराशी,
संत चरणी भुक्ती मुक्ती दासी॥ २ ॥
एका जनार्दनी पार नाही सुखा
म्हणोनी देव भुलले देखा देखा॥ ३ ॥