कडुलिंबाला आला कसा गोड पाला
कडुलिंबाला आला कसा गोड पाला
झालो दंग मी पाहून या साईलीला॥
पावन साईचे हे गुरुस्थान,
वाणी थकेल गाता गुणगान
रिता ना कोणी बी इथंन गेला
झालो दंग मी....॥ १ ॥
मूर्ती समोरी ह्या साई मंदिरी,
झोळी सुखानं माझी भरते सारी...
साईनाथ धावतोय हाकेला..
झालो दंग मी....॥ २ ॥
द्वारकामाई माझी आई,
लेकरा परी मजला बिलगून घेई
कुशीत घ्यायची या बाळाला
झालो दंग मी....॥ ३ ॥
कडुलिंबाला आला कसा गोड पाला
झालो दंग मी पाहून या साईलीला॥