हरिपाठ→श्री संत ज्ञानेश्वर महाराजकाळ वेळ नाम📤 Share♡ Favoriteकाळ वेळ नाम उच्चारितां नाहीं । दोन्ही पक्ष पाहि उद्धरती ॥१॥ रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि ऐक ॥२॥ हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या देवाची कोण वाणी ॥३॥ ज्ञानदेवा संग झाला हरिपाठ । पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→