कान्हा धरू नको रे पदराला ।
बाजाराला जाऊदे बाजाराला ।। धृ ।।
दिवस उगवुनी किती वर आला ।
उशीर झाला बाई मला बाजाराला ॥
बाजाराला जाऊदे बाजाराला ।।१।।
दह्या दुधाचे डोईवरी माठ ।
चढुनी जाते बाई मथुरेचा घाट ॥
बाजाराला जाऊदे बाजाराला ।।२।।
एका जनार्दनी बाजारी जाते ।
दह्या दुधाचे विक्री मी करते ॥
बाजाराला जाऊदे बाजाराला ।।३।।