कश्यप गौतम भारद्वाज अत्री
कश्यप गौतम भारद्वाज अत्री ।
ऋषि विश्वामित्र नाम थोर ॥१॥
जमदग्नि मुनि वसिष्ठ वर्णिला ।
तिन्हीं लोकीं झाला वंद्य एक ॥२॥
नाम घेतां नुरे पाप ताप दैन्य ।
होय थोर पुण्य उच्चारितां ॥३॥
तुका म्हणे ऐसी उच्चारितां वाणी ।
तेथें अंतःकरणीं सुख होय ॥४॥