किती आनंदी आनंद या
झोपडीत माझ्या ।।धृ।।
भूमीवरी पडावे आकाश पांघरावे ।
पायाकडे पहावे या झोपडीत माझ्या ।।१।।
पेट्या आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या ।
दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या ।।२।।
येत जरी सुखे या जाता तरी सुखे जा ।
तुकड्या वरी बसाया या झोपडीत माझ्या ।।३।।