किती करशील संसार
नरदेह मातीला जाणार ॥ धृ ॥
चांदी सोने पैशाचं गाठोडं
भाग्यावरी राहणार
नरदेह मातीला जाणार ॥ १ ॥
शेतीवाडी, बंगला माडी
धन दुसऱ्यांचं होणार
नरदेह मातीला जाणार ॥ २ ॥
मायबाप बंधू बहीण
संग कुणी ना येणार
नरदेह मातीला जाणार ॥ ३ ॥
जनी म्हणे नरदेह जन्म
पुन्हा नाही मिळणार
नरदेह मातीला जाणार ॥ ४ ॥