लाजली कृष्णाला राधा लाजली
त्याने केली कला अशी दावली लिला
त्याच्या मुरलीची गोडी लावली
लाजली कृष्णाला राधा लाजली
आली राधा आली
चोर पावलांन लपून आली
हडू हडू हडू हडू
वृंदावनी त्या कदम्बा खाली
नाही कळल्या कोणा त्याच्या खुणा
राधा कृष्णाची जोडी जमली
लाजली कृष्णाला राधा लाजली
झाला अहो झाला..
साऱ्या गोकुळात बोलबाला
अरे अरे अरे अरे
कृष्णा न केला गोपाळ काला
काल आईन दुपारी यमुनेच्या तिरी
श्रीहरीची बासरी वाजली
लाजली कृष्णाला राधा लाजली
केली अहो केली
कशी उत्तम ही कमाल केली
हाय हाय हाय हाय
राधा गवळण बोलून गेली
भाव भक्ती करी राधेच्या उरी
अशी प्रीत ही जगात गाजली
लाजली कृष्णाला राधा लाजली