माझा शिण भाग अवघा हरपला
माझा शिण भाग अवघा हरपला । विठोबा विटेवरी देखिला ॥१॥
अवघ्या जन्मांचें सार्थक झालें । डोळा समचरण देखिलें ॥२॥
चंद्रभागे तीरीं नाचती वारकरी । आनंदानें विठ्ठलाच्या नाम गजरीं ॥३॥
तो सुखसोहळा देवांसी दुर्लभ । आम्हां तो सुलभ चोखा म्हणे ॥४॥