गौळण→कृष्णमाझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी♡ Favoriteमाझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी ... ।।धृ।। बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई ... ।।१।। पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती सांगू काय ... ।।२।। माझी बहीण चंद्रभागा, करिसे पापभंगा ... ।।३।। एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण ... ।।४।।आणखी भक्ती साहित्यगौळण पहा→