मुळीच न म्हणत रे कान्हा माझ्या मनात
तुझ्यासाठी आले वनात कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात || धृ ||
तुझ्यासाठी सोडले घरदार
तुझ्यासाठी सोडिला संसार
मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात
तुझ्यासाठी आले वनात || १ ||
तुझ्यासाठी केल्या मी एकादशी
तुझ्यासाठी राहिले उपवाशी
मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात
तुझ्यासाठी आले वनात || २ ||
एका जनार्दनी विनविती राधा
शरण आले मी तुला गोविंदा
मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात
तुझ्यासाठी आले वनात || ३ ||