गौळण→कृष्णनको वाजवू श्री हरी मुरली♡ Favoriteनको वाजवू श्री हरी मुरली तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे ।।धृ।। घरी करीत होते मी कामधंदा तेथे मी गडबडली रे ।।१।। घागर घेऊनी पाणियाशी जाता दोही वर घागर पाजरली ।।२।। एका जनार्दनी पूर्ण कृपेने राधा गवळण घाबरली ।।३।।आणखी भक्ती साहित्यगौळण पहा→