नामाचा प्रताप न वर्णवेचि मज
नामाचा प्रताप न वर्णवेचि मज ।
सांग गरुडध्वज राहे तेथें ॥१॥
मम वाचा किती परतल्या श्रुती ।
वेद मुखें श्रुती मौन ठेले ॥२॥
वर्णूं नेणें शेष नामाचा पवडा ।
चिरलिया रांडा जिव्हा त्याच्या ॥३॥
अनुसरली रमा वर्णावया श्रीहरी ।
पायांची किंकरी होऊनि ठेली ॥४॥
तुका म्हणे आम्ही मानव किंकर ।
वर्णावया पार न कळे तुझा ॥५॥