नमिला गणपती माऊली सारजा
नमिला गणपती माऊली सारजा ।
आतां गुरुराजा दंडवत ॥१॥
गुरुरायाचरणीं मस्तक ठेविला ।
आल्या स्तुतीला द्यावी मती ॥२॥
गुरुराया तुजऐसा नाहीं सखा ।
कृपा करुनी रंका धरीं हातीं ॥३॥
तुका म्हणे माता पिता गुरु बंधु ।
तूंचि कृपासिंधु पांडुरंगा ॥४॥