हरिपाठ→श्री संत ज्ञानेश्वर महाराजनित्यनेम नामीं📤 Share♡ Favoriteनित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥ नारायण हरी नारायण हरी । भुक्ति मुक्ति चारी घरिं त्यांच्या ॥२॥ हरिविण जन्म नरकचि पै जाण । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥३॥ ज्ञानदेव पुरे निवृत्तिसी चाड । गगनाहुनि वाड नाम आहे ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→