अभंग→गणपतीॐकार प्रधान रूप गणेशाचे♡ Favoriteॐकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥ धृ ॥ अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, मकार महेश जाणियेला ॥१॥ ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न, तो हा गजानन मायबाप ॥२॥ तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पाहता पुराणी व्यासांचीया ॥३॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→