हरिपाठ→श्री संत ज्ञानेश्वर महाराजपर्वताप्रमाणें पातक📤 Share♡ Favoriteपर्वताप्रमाणें पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तासी ॥१॥ नाहीं ज्यासी भक्ति तो पतित अभक्त । हरीसी न भजत देवहत ॥२॥ अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैसेनि गोपाळ पावे हरी ॥३॥ ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वाघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→