हरिपाठ→संत श्री तुकाराम महाराजप्रातःकाळीं नाम पवित्रचि घ्यावें♡ Favoriteप्रातःकाळीं नाम पवित्रचि घ्यावें । तेणें विसरावें जन्ममृत्यु ॥१॥ नळ युधिष्ठिर जनक जनार्दन । स्मरणेंचि धन्य होती प्राणी ॥२॥ न करा आळस नाम घेतां वाचे । नाहीं भय साचें प्राणियांसी ॥३॥ तुका म्हणे वाचें गाईल गोविंद । होईल परमानन्द नामें एका ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→