पूजूं नारायण शब्दाचे सुमनें
पूजूं नारायण शब्दाचे सुमनें ।
मंत्रपुष्प तेणें वाहियेलें ॥१॥
भावाचे पैं हातीं जोडुनी ओंजळ ।
समर्पिलें जळ शुद्ध भावें ॥२॥
मुखशुद्धी तांबूल दिलें तुळसीदल ।
आनंद सकळ ओसंडला ॥३॥
तुका म्हणे आतां उरलें नाहीं ।
नामाविण कांहीं बोलावया ॥४॥