राधा गवळण मी गोकुळची
झाले मी देवा तुमच्या प्रेमाची ॥ धृ ॥
असं हो कसं झालं, यमुनेला पाणी आलं
करा तयारी बाई न्हिण्याची
झाले मी देवा तुमच्या प्रेमाची ॥ १ ॥
कोठुनी ग आला बाई, मथुरेच्या कृष्ण बाई
खोडा मरोळी करी हा मस्करी
झाले मी देवा तुमच्या प्रेमाची ॥ २ ॥
नीरा म्हणे कृष्ण देवा, करीन मी तुमची सेवा
धन्य झाले मी तुमच्या चरणाची
झाले मी देवा तुमच्या प्रेमाची ॥ ३ ॥