राधे तुझ्या कानात हो हो हो
झुंबर वाज्याने हलतंय गं
झुंबर वाज्याने हलतंय गं
कान्हा गोड गोड बोलतोय गं
घागर घेऊन नि पाण्याशी जाता
आड रस्त्यामध्ये कान्हा उभा होता
राधे तुझ्या कानात झुंबर वाज्याने हलतंय
दही दूध घेऊनी मथुरेशी जाता
आड रस्त्यामध्ये कान्हा उभा होता
राधे तुझ्या कानात झुंबर वाज्याने हलतंय
एका जनार्दनी गवळण राधा
लागू नको रे हरीच्या या नादा
राधे तुझ्या कानात झुंबर वाज्याने हलतंय