राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरी मळकट चंदनाची उटी ।
रुळे माळ कंठीं वैजयंती ॥२॥
मुकुट कुंडलें श्रीमुख शोभलें ।
सुखाचें ओतिलें सकळही ॥३॥
कांसे सोनसळा पांघरे पाटोळा ।
घननीळ सावळा बाइयांनो ॥४॥
सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा ।
तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥५॥