रोज रोज छळतय यशोदे तुझं ग पोरं
रोज रोज छळतय यशोदे
तुझं ग पोरं
त्याच्या पायाला बांधून
ठेवतेय दोर गं ॥ धृ ॥
घागर घेऊन पाणियाशी जाता
आडवा कान्हा वाटेत होता
चावट हाय लई यशोदे तुझं ग पोरं ग
त्याच्या पायाला बांधून ठेवतेय दोर गं ॥१॥
दही दूध घेऊनी मथुरेशी जाता
आडवा कान्हा वाटेत होता
चावट हाय लई यशोदे तुझं ग पोरं ग
त्याच्या पायाला बांधून ठेवतेय दोर गं ॥२॥
एका जनार्दनी गवळण राधा
राधा लागली हरीच्या नादा
चावट हाय लई यशोदे तुझं ग पोरं ग
त्याच्या पायाला बांधून ठेवतेय दोर गं ॥३॥