सात जणी बहिणी आठवा काना
काना खेळतो या गोकुळामध्ये, कृष्ण नांदतो ॥
सात जणी बहिणी आठवा काना
काना खेळतो या गोकुळामध्ये, कृष्ण नांदतो ॥
मळ्यात जातो फुलं तोडितो
फळं तोडितो घेऊन येतो लाडक्या बायांना
घरी घेऊन येतो लाडक्या बायांना ॥
बागेत जातो लिंब तोडितो
नारळ घेतो घेऊन येतो
लाडक्या बायांना घरी घेऊन येतो लाडक्या बायांना ॥
घरात जातो मडके फोडितो
दही दूध घेऊन येतो
लाडक्या बायांना घरी घेऊन येतो लाडक्या बायांना ॥
आमचा कान्हा दिसतो लहान
पायात वाळा, वेताची छडी दिली या बायांना
त्याने वेताची छडी दिली या बायांना ॥